Magu Kasa Mi - मागू कसा मी






मागू कसा मी, अन मागू कुणा,
माझी व्यथा ही, समजाऊ कुणा,
आहे उभा बघ दारी तुझ्या
जाणून घेरे जरा याचना
देशील का कधी झोळीत ह्या
तू दान माझे मला जीवना
झोळी रीती आहे जरी
आशा खुळी माझ्या उरी
आत टाहो ह्या मनाचा आहे खरा
घाव ओल्या काळजाला दावू कुणा
शोधू कुठे माया तिची
तिचा लळा छाया तिची
मी भिकारी जीवनी ह्या आईविना
सोसवेना वेदना सांगू कुणा


Movie: Bhikari
Music: Vishal Mishra
Lyrics: Guru Thakur
Singer: Ajay Gogavale
Music Label: Zee Music Marathi

Comments