तुझे रुप चित्ती राहो, मुखी तुझे नाम
देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम
देह धारी जो जो त्याचे विहीत नित्यकर्म
सदाचार नीतीहूनी आगळा ना धर्म
तुला आठवावे, गावे, हाच एक नेम
तुझ्या परी वाहीला मी देहभाव सारा
उरे अंतराळी आत्मा, सोडूनि पसारा
नाम तुझे घेतो गोरा, म्हणूनी आठयाम
Comments
Post a Comment