Ye Re Ghana - ये रे घना, ये रे घना

ये रे घना, ये रे घना
न्हाउ घाल माझ्या मना

फुले माझि अळुमाळु, वारा बघे चुरगळू
नको नको म्हणताना, गंध गेला रानावना

टाकुनिया घरदार नाचणार, नाचणार
नको नको म्हणताना, मनमोर भर राना

नको नको किती म्हणू, वाजणार दूर वेणू
बोलावतो सोसाट्याचा, वारा मला रसपाना

Comments

Post a Comment