Sandhikali Ya Ashya - संधीकाली या अशा

संधीकाली या अशा, धुंदल्या दिशा दिशा, चांद येई अंबरी
चांद राती रम्य या, संगती सखी प्रिया, प्रीत होई बावरी

मुग्ध तू नि मुग्ध मी, अबोल गोड संभ्रमी, एकरुप संगमी
रातराणीच्यामुळे, श्वास धूंद परिमळे, फुलत प्रीतीची फुले
प्रणयगीत हे असे, कानी ऐकू येतसे, गीती शब्द ना जरी

सांजरंगी रंगूनी, नकळताच दंगूनी, हृदयतार छेडूनी
युगुल गीत गाऊनी, एकरुप होऊनी, देऊ प्रीत दाऊनी
प्रणयचित्र हे दिसे, रंगसंगती ठसे, कुंचला नसे जरी
 
 
गीतकार- गंगाधर महांबरे
गायक- लता - अरुण दाते
संगीतकार- पं. हृदयनाथ मंगेशकर

Comments