आई मला पावसांत जाउं दे एकदाच ग भिजुनी मजला चिंब चिंब होउं दे मेघ कसे हे गडगड करिती विजा नभांतुन मला खुणविती त्यांच्यासंगे अंगणांत मज खुप खुप नाचुं दे खिडकीखाली तळें साचलें गुडघ्याइतके पाणी भरलें तर्हेतर्हेच्या होड्यांवृची मज शर्यत ग लावुं दे बदकांचा बघ थवा नाचतो बेडुकदादा हाक मारतो पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करुं दे धारेखाली उभा राहुनी पायाने मी उडविन पाणी ताप खोकला शिंका सर्दी वाट्टेल ते होउं दे
Comments
Post a Comment