जीवनगाणे गातच रहावे
झाले गेले विसरुन जावे, पुढे पुढे चालावे
सातसुरांचा हा मेळा, व्यापून उरला विश्वाला
हृदये हलता वरखाली, ताल मिळे या गाण्याला
तुमच्या माझ्या श्वासामधूनी आकारा यावे
जीवनगाणे गातच रहावे ...
चिमणाबाई हिरमुसली, गाल फुगवूनी का बसली
सान बाहुली ही इवली, लटकी लटकी का रुसली
रुसली रुसली, खुदकन हसली, पापे किती घ्यावे
जीवनगाणे गातच रहावे ...
Comments
Post a Comment