Mi Radhika Mi Premika - मी राधिका मी प्रेमिका

मी राधिका मी प्रेमिका 
तन शाम, मन शाम, प्राणसखा घन:श्याम 
रंगले जयाचे रंगी 
मी राधिका मी प्रेमिका 

अपरात्री कुंजवनी , सूर मधुर जाग मनी 
कळेना ,सुचेना, माझी मी उरेना 
साहवेना,मीलनाशी आतुरले 
मी राधिका मी प्रेमिका

श्यामरंग, श्याम्संग, मिलनात चित्तदंग
सुखाच्या क्षणी  ही, मोहुनी वाजे ही
मनवीणा मंत्रमुग्ध मोहरले
मी राधिका मी प्रेमिका

येई भान तृप्त गात्र, गोकुळी पहाट मात्र 
कुणा हे सांगू मी, कसे हे सांगू मी 
उमजेना, श्यामक्षण जगले 
मी राधिका मी प्रेमिका


Get this widget |Aarati Ankalikar|Mi Radhika Mi Premika

Comments