नटरंग



खेळ मांडला

तुझ्या पायरिशी कुणी सान थोर न्हाई
साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई
हेय ..तरी देवा सर ना ह्यो भोग कशा पायी
हरवली वाट दिशा अंधारल्या धाई
वावाळूनी उधळतो जीव माया बापा
वानवा ह्यो उरी पेटला

खेळ मांडला  खेळ मांडला
खेळ मांडला ..देवा .. खेळ मांडला ..

सांडलं गा रीत भात घेतला वसा तुझा
तूच वाट दाखीव घ्या खेळ मांडला
दावी देवा पैल पार पाठीशी तू रहा उभा
ह्यो तुझ्याच उंबर्यात खेळ मांडला

हेय ..उसवला गण गोत सारं आधार कोनाचा न्हाई
भेगाळल्या भुई परी जीणं अंगार जीवाला जाळी
बाला दे झुंजायला किरपेची ढाल दे
इनाविती पंचा प्राण जीव्हारात ताल दे
करपल रान देवा जाळला शिवार
तरी न्हाई धीर सांडला

Comments