विसरु नको श्रीरामा मला
मी तुझ्या पाऊली जीव वाहिला, प्रिया || ध्रु ||
किती जन्म झाले तुझी प्रेमिका मी
कितीदा नव्याने तुला भेटले मी
तुझी सावली झाले
घेऊनी हिंडले सतीचा वसा, प्रिया || १ ||
तू सांब भोळा उमा पार्वती मी
तू कृष्ण काळा तुझी राधिका मी
युगायुगांचे नाते
आपुले वेगळे जुळे श्यामला प्रिया || २ ||
कसे दान आले रित्या ओंजळीत
तुज्याविन झाले अभागी अनाथ
तुज्या अन्कुरासाठी
सोसते झेलते उन्हाच्या झळा || ३ ||
मी तुझ्या पाऊली जीव वाहिला, प्रिया || ध्रु ||
किती जन्म झाले तुझी प्रेमिका मी
कितीदा नव्याने तुला भेटले मी
तुझी सावली झाले
घेऊनी हिंडले सतीचा वसा, प्रिया || १ ||
तू सांब भोळा उमा पार्वती मी
तू कृष्ण काळा तुझी राधिका मी
युगायुगांचे नाते
आपुले वेगळे जुळे श्यामला प्रिया || २ ||
कसे दान आले रित्या ओंजळीत
तुज्याविन झाले अभागी अनाथ
तुज्या अन्कुरासाठी
सोसते झेलते उन्हाच्या झळा || ३ ||
Comments
Post a Comment