शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती ?

शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती ?
देव, देश अन धर्मापायी प्राण घेतले हाती !
शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती || ध्रु ||

आईच्या गर्भात उमगली झुन्जाराची रीत
तलावारीशी लगीन लागल जडली येडी प्रीत
लाख संकट झेलुन घेईल अशी पहाडी छाती
देव, देश अन धर्मापायी प्राण घेतले हाती ! ... || १ ||

झुन्जाव वा काटून माराव हेच आम्हाला ठाव
लाढुन मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव
देशापयी सारी इसरू माया ममता नाती
देव, देश अन धर्मापायी प्राण घेतले हाती ! ... || २ ||

Comments